दिव्यांग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| चणेरा | प्रतिनिधी |

रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल सप्ताहांतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांचा, कल्याणाचा या उपक्रमांतर्गत रोहा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्दर्शनाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आशिष मिश्रा, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन गोमसाले, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. हर्ष गुजरार्थी व मानसरोग तज्ज्ञ डॉ. सिंग मॅडम, समुपदेशक कांबळे मॅडम, समाजसेवक सुशील साइकर व विविध विषयांतील तज्ज्ञ उपस्थित होते. सुमारे 253 व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आवश्यक रुग्णांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

या शिबिराचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय ससाणे, डॉ. विश्‍वनाथ देशमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी, मेट्रन गोवंडे मॅडम, इंचार्ज वाणी मॅडम, सुरवसे मॅडम, नर्सिंग स्टाफ व कर्मचार्‍यांनी केले.

Exit mobile version