| उरण | प्रतिनिधी |
बी.एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतीच चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी रंगतदार फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. नर्सरीतील विद्यार्थी फळांच्या वेशात, ज्युनिअर केजीतील विद्यार्थी प्राण्यांच्या वेशात, तर सीनियर केजीतील विद्यार्थी फुलांच्या वेशात सजले होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास बी. पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील सादरीकरण कौशल्य विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत नर्सरीमधील प्रिंसिका कोळी, रिदान कासकर, प्रिन्स नवले, अश्वा नवाले, अनन्य पाटील, शर्व शेलके, आयान पाटील, सार्थ घरत, आर्य माळी; ज्युनिअर केजीमधील क्रियांश नवाले, क्रिशा ठाकूर, समप्रिती पाटील, श्रीजा जोशी, मायरा चिट्टमपल्ले, मितांश पाटील, शौर्य पाटील, शौनक पाटील, प्रिन्स गडरी, गोविंद भाटी, प्रिशा ताम्राकर, आराध्य थळी; तसेच सीनियर केजीमधील मोक्षा जोशी, सायरा घरत, हर्षिता जैसवाल, दुर्गा भाटी, वर्षा देवाशी यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
