। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम खांब येथे लायन्स क्लब कोलाड रोहा तसेच आयकेएस केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.13) येथील विद्यार्थी व विशेषतः महिलांसाठी हिमोग्लोबिन, डायबिटीस, ब्लडपेशर चेकअप शिबिराचे मोफत आयोजित करण्यात आले होते. तर या शिबिराला विद्यार्थ्यांसहित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर विद्यार्थ्यांसह 251 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे या शिबिरात गरजू तसेच रुग्णांना मोफत औषेध उपचार, तीन महिन्यांची मोफत औषधे देण्यात आली असून तीन महिन्यांनी यांची पुन्हा तपसणी करून योग्य ते उपचार केले जाणार आहेत.
यावेळी एमजेएफ लायन्स विवेक सुभेकर डिस्ट्रिक्ट चेरपर्सन, डॉ.विक्रांत दळवी,डॉ. कृष्णान, डॉ. रषद प्रांजली भोसले, लायन्स क्लब कोलाडचे अध्यक्ष ऍडो.रविंद्र
लोखंडे, उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे, सचिव अलंकार खांडेकर, खजिनदार गजानन बामणे, विश्वास निकम, दिलीप मोहिते, रिया लोखंडे, पुजा लोखंडे, शिक्षक वर्ग, खांब परिसरातील असंख्य महिला, असंखे विद्यार्थी तसेच वैद्यकीय टीम उपस्थित होती.





