कांदळेेपाडा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

। पेण । वार्ताहार ।
कांदळे ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या का़ंदळेपाडा येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 100 रूग्णाची मधुमेह, रक्तदाब तपासणी, मुतखडा, व डायलिसिस तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली.
उन्नती हॉस्पिटल आणि आय सी यु पनवेल, शिवतेज युवा मंडळ व ग्रुप ग्रामपंचायत कांदळे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन रा. जि. प. शाळा कांदळेपाडा येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन कांदळे सरपंच मुरलीधर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अविनाश भोईर, ग्रामसेविका अर्चना पाटील, टी. एल. म्हात्रे, प्रभाकर गावंड, केसरीनाथ गावंड, प्रदीप म्हात्रे, हर्षद लांगी, स्वाती भोईर, दिलीप भोईर उपस्थित होते. रुग्णाची तपासणी उन्नती हॉस्पिटलचे पांडुरंग वरालकर, डॉ. इंदर चव्हाण, जगदीश पाटील, श्रीकांत किल्लेकर, प्रतीक पानकर,मोनिका सतामकर, साक्षी झावरे, आरती चेरफळे या टीमने केले. त्यांना आशासेविका शशिकला भोईर, करुणा भोईर अंगणवाडी सेविका मोहिनी म्हात्रे,वर्षा पाटील यांनी सहकार्य केले.

Exit mobile version