। उरण । प्रतिनिधी ।
उरण येथे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या मोटारसायकल रॅलीला उरण शहर व परिसरातील गावातून तरूणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उरणच्या कोट नाक्यावरून निघालेल्या रॅलीत तरुण युवक, शहरातील व्यापारी उद्योजक व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.15) महागणपती चिरनेर येथे बाप्पाचे दर्शन घेऊन प्रीतम म्हात्रे यांची मोटारसायकल रॅली पुढे भोम, कळंबूसरे, मोठी जुई, कोप्रोली, पानदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कोप्रोली, खोपटा, उरण शहर येथे नेण्यात झाली. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी येऊन येऊन येणार कोण, प्रीतम दादा शिवाय आहेच कोण, उरणचे आमदार प्रीतम दादा होणार, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी जेएनपीटी कामगार नेते रवि घरत, प्रवक्ते रमाकांत म्हात्रे, निधी ठाकूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रीतम म्हात्रेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
