शिहू येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिहू येथील होतकरू तरुण डॉक्टर परशुराम भोईर यांच्या विशेष प्रयत्नाने त्यांच्या शिहू (ता. पेण ) येथील दवाखान्यात दरवर्षीप्रमाणे जागतिक डॉक्टर डे च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बोलत होते.
यावेळी डॉ. राजेंद्र धात्रक ,डॉ.रोहिदास शेळके, डॉ.सुनिल पाटील, डॉ.पुरुषोत्तम भोईर, डॉ.प्रिया भोईर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. के. कुथे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष शेकाप नेते प्रसाद भोईर, पेण पं. स. चे माजी सभापती संजय भोईर, रिलायन्सचे इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील, रिलायन्स नागोठणे युनिटचे कामगार नेते लक्ष्मण खाडे, शिहू माजी सरपंच नरेश पाटील, ऍड. प्रणाली पाटील, विशाल दिवेकर, विजय पाटील, दामोदर भोईर, राजेश गदमले, नामदेव म्हात्रे , डॉ. सनी राजेंद्र धात्रक, डॉ. अमित पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. संकेत म्हात्रे, डॉ. रुपेश होडबे, डॉ. प्रथमेश बुधे, डॉ .मुकेश सिंग, डॉ. अभिजित जोशी आदींसह अलिबाग रक्तपेढीच्या डॉ. सारिका बिडये, डॉ.दिक्षा तोडणकर, सुनिल बंदिछोडे, पुनम पाटील, आकाश सावंत, उमेश पाटील, अमोल साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान रविवारी रोहा तालुका मेडिकल चारीटेबल अससोसिएशनचे रोहा शहरातील काही डॉक्टर्स सामाजिक बांधिलकी जपून वारकरी तथा माऊली भक्तांसाठी फलटण येथे आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर घेणार असल्याची माहितीही रोहा तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांनी दिली आहे. या शिबिरासाठी डॉ. राजेंद्र धात्रक यांनी त्यांच्या वतीने औषधे दिलेले आहेत. कोविड महामारीच्या कठीण काळात रुग्णांची प्रामाणिक सेवा करणारे नागोठणे विभागातील डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनिल पाटील, डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. प्रिया भोईर, डॉ. प्रथमेश बुधे, डॉ. संकेत म्हात्रे डॉक्टरांचा रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये शेकाप नेते प्रसाद भोईर, पेण पं. स. चे माजी सभापती संजय भोईर, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोईर, डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. संकेत म्हात्रे, प्रदिप कोळंबेकर आदी मान्यवरांचाही समावेश होता.

Exit mobile version