विद्यार्थ्यांना दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शालेय विद्यार्थी सध्या विविध दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करतात. विद्यार्थ्यांना कर्जत येथे फेऱ्या मारायला लागू नये यासाठी शिवसेना नेरळ शहर शाखा यांच्या माध्यमातून शालेय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 201 विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दाखले मिळविण्यासाठी नोंदणी केली.

नेरळ येथील अंबामाता मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप यांचे हस्ते झाले. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार नंदू कोळंबे, शहर प्रमुख प्रभाकर देशमुख,शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे, जयवंत साळुंखे, महिला आघाडी उपतालुका संघटक वर्षा बोराडे, उपशहर प्रमुख पंढरीनाथ चंचे, ग्रामपंचायत सदस्य गीतांजली देशमुख, जयश्री मानकामे, उमा खडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी महत्त्वाचे असलेले एक आणि तीन वर्षे उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र यांच्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले. तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाचे प्रतिनिधी मनोज भोईर यांच्या माध्यमातून शिबिरात अर्ज भरलेल्या त्या सर्व लाभार्थ्यांना शिवसेना पक्षाकडून तीन दिवसांनी दाखले घरपोच दिले जाणार आहेत.

या शिबिरासाठी महसूल विभागाचे नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे, नेरळ तलाठी विकास गायकवाड, कोल्हारे तलाठी उमेशकुमार भोरे, शेलू तलाठी वैशाली मानते, दहिवली तर्फे वरेडी उमाकांत गुरुमुर्ती, पाषाने तलाठी माधुरी चौधरी, दामत तलाठी आशिष राऊत, माणगाव तलाठी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना कागदपत्र बनवून देण्यासाठी मदत केली. त्यांना कोतवाल अशोक भगत, सहकारी अर्चना म्हसे, चेतन फराट, दूंदा गायकवाड,दिनेश शिंदे,कोतवाल दिपक पेरणे यांचे सहकार्य लाभले.

शिबिरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरून घेण्यासाठी मदत युवासेनेचे प्रमोद कराळे, सूरज साळवी, देवेंद्र दाभने, अमोल फड, विशाल सोनावणे, हर्ष खडे, योगेश घोलमकर, ओमकार खडे, महिला आघाडीच्या जयश्री, केतकी सावंत, वर्षा काटे यांनी सहकार्य केले. या शिबिरात एकूण 201 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी दिली.

Exit mobile version