सावर्डे विद्यालयातील निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिद्धी भंडारीने पटकाविला प्रथम
चिपळूण | प्रतिनिधी |
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा या अभियान अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्य सुधारावे, भारतीय इतिहासात महिलांनी केलेल्या आदर्शवत कामाचे माहिती व्हावी व या माध्यमाद्वारे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा, लिंग समानता जोपासणारा समाज, मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण इत्यादी विषयांवर या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून 121 विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सहभागी विद्यार्थ्यांतून प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा या विषयावर लिहिलेल्या निबंधाला सिद्धी शशिकांत भंडारी आठवी ब, प्रियल सुभाष घाणेकर आठवी ड व आर्या अशोक भंडारी नववी ब या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. लिंग समानता जोपासणारा समाज या विषयावर लिहिलेल्या नववी ड मधील स्वराली नितीन पुरोहित व मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण या विषयावर आधारित लिहिलेल्या आठवी ब मधील रिया अनंत शिगवण या विद्यार्थिनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले आहे. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिलीप डंबे व जयंत काकडे यांनी काम पाहिले. विद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यतत्पर आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, ज्युनिअर विभागाचे प्रमुख विजय चव्हाण, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख सलीम मोडक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version