म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लसीबाबत कोणताही गैरसमज नसल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय म्हसळा, प्रा.आ. केंद्र खामगाव, प्रा.आ. केंद्र मेंदडी व प्रा.आ. केंद्र म्हसळा अशा चार केंद्रांवर लसीकरण केंद्र सुरु आहे.
प्रा.आ. केंद्र मेंदडी अंर्तगत खरसई, वारळ, रेवली, वरवठणे, तोंडसुरे, गोंडघर, काळसुरी, तुरांबाडी, प्रा.आ. केंद्र खामगाव अंर्तगत आंबेत, मांदाटणे, चिखलप आदिवासीवाडी, संदेरी, देवघर कोंड, वावे, तोराडी, आमशेत या गावांतून प्रत्यक्ष भेटी देऊन लसीकरण करण्यात आले. यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यासाठी प्रा.आ.केंद्र खामगाव येथील डॉ. गीतांजली हंबीर, डॉ. प्राजक्ता पोटे प्रा.आ. केंद्र मेंदडी येथील डॉ. विशाल भावसार, डॉ. पूजा डोंगरे व प्रा.आ. केंद्र म्हसळा येथील डॉ. प्रियांका देशमुख, डॉ. नेहा पाटील, आरोग्य सेवक मंगेश चव्हाण, अरुण कोल्हे, सागर सायगावकर आरोग्य सेविका शीतल भगत, दीपिका दिवेकर, ज्योती महाडिक, आरोग्य सहाय्यक शैलेश लाखे, गणेश दाताळ, स्थानिक आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्रा. शाळांचे शिक्षक, पोलीस पाटील यांनी चांगली मदत केली. तालुक्यात आजपर्यंत सुमारे 40 टक्के लसीकरण झाले असून, पहिला डोस घेणार्यांची संख्या 11109, दुसरा डोस 968 लाभार्थिंनी घेतला आहे.