राज्यात नगरपंचायतींसाठी उत्स्फूर्त मतदान

सरासरी 80 टक्के मतदान
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 106 नगरपंचायतींसह भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांसाठी मंगळवारी शांततेत आणि उत्स्फूर्तपणे मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 80 ते 95 टक्के मतदान झाले आहे.या मतदानाची मतमोजणी आता 22 जानेवारीला होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 337 ओबीसी आरक्षित जागा रद्द करुन तेथे खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील 106 नगरपंचायतींमधील एकूण 1 हजार 802 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
याशिवाय भंडारा नगरपरिषदेत एकूण 52 जागांवर निवडणूक घेण्याक आली. त्यातील 13 जागांसाठी आता 18 जानेवारीला मतदान होणार आहे.
गोंदियातील जिल्हा परिषदेत 53 मतदार संघातही मंगळवारी शांततेत मतदान घेण्यात आले.किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. येथील 10 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे.

Exit mobile version