उन्हाच्या काहिलीचा पर्यटनाला फटका
| कोर्लई | वार्ताहर |
पर्यटनात जून महिन्याच्या पहिल्या रविवारी मुरुड-बीचवर तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती. उन्हाच्या काहिलीचा पर्यटनावर परिणाम दिसून आला, तर काही पर्यटकांनी रखरखत्या उन्हात समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
मुरुड बीचवर पर्यटकांची मे महिन्याच्या तिसर्या, चौथ्या विकेंडला गर्दी पाहावयास मिळाली होती. मे महिना संपून जून महिन्याच्या पहिल्या रविवारी तापमानाचा परिणाम कमी प्रमाणात गर्दी दिसून येत होती.. मुरुड बीच व काशीद बीच हे पर्यटनात जगप्रसिद्ध असल्यामुळे या बीचवर पर्यटकांची सातत्याने वाढती वर्दळ असते. पर्यटनात पुणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, धुळे यवतमाळ अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून व देश विदेशातून पर्यटक मुरुडला भेट देत असतात. मुरुड समुद्रकिनार्यावरील रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, समुद्रामध्ये मध्यभागी असलेला पद्मदुर्ग, मुरुडला असणार्या नारळी पोफळीच्या बागा यामुळे पर्यटक मुरुड कडे आकर्षित होत आहे. काशीद बीचवर असणारी रुपेरी वाळू, उंच उंच सुरुची झाडे त्यामुळे पर्यटक काशीद बीचला ही मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. परंतु, जून महिन्याच्या पहिल्या रविवारी तापमानाचा परिणाम पर्यटकांची कमी प्रमाणात गर्दी दिसून येत होती. याची झळ पर्यटन व्यवसायाला बसली आहे.






