| नागोठणे । प्रतिनिधी ।
महाविद्यालयामधून विद्यार्थी सर्वगुण संपन्न होऊन बाहेर पडावा व पुढे कोणत्याही क्षेत्रात जाऊन गुणवान व किर्तीमान व्हावा या उद्देशाने कॉलेजचे अध्यक्ष किशोरशेठ जैन व कॉलेजचे सी.ई.ओ कार्तिक जैन यांच्या मार्गदर्शनाने कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. बुद्धिबळ, कॅरम, बॅटमिंटन, बॉक्सक्रिकेट, वेटलिफ्टिंग, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, हॉलीबॉल, डॉसबॉल, टग-ऑफ-वॉर, रिले, गोळाफेक, रनिंग, या खेळांच्या स्पर्धा प्रा. अमोल गावित, प्रा. निलम पाटील, प्रा. सुनील दर्डे, प्रा. स्वरांजली लोखंडे, प्रा. अस्मिता पाटील. प्रा. नम्रता बलकावडे, प्रा. मयूरी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता, चिकाटी, धैर्य, आणि प्रामाणिक पणा तसेच खेळाडू वृत्तीने आपआपले गुणकौशल्य दाखवले.
हळदीकुंकू व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्यावर कॉलेज, रुग्णालय व संस्थामध्ये प्रत्येक कर्मचा-यांनाही खेळाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने सी. ई. ओ. कार्तिक जैन व रजिस्टार वैभव नांदगावकर यांच्या संकल्पनेतून आगळे वेगळे सर्वाना हेवा वाटावा असे बंधुत्वभाव, समता व एकताचे प्रतिक क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री व पुरुष असा भेदभाव न करता हे सामने एकत्रितपणे खेळवण्यात आले. या सामान्यांचे खास वैशिष्ठ्ये म्हणजे सफाई कामगारा पासून ते नर्स, डॉक्टर्स, शिक्षक ते संस्थेचे सीईओ हे सर्वजण खेळात सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण 8 संघानी भाग घेतला होता. सामने पार पडत असताना खेळाडूंच्या व प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार नव्हता. डोळ्यांचे पारणे फिटावे अशी दृश्य पाहायला मिळत होती. प्रत्येक सामना अटी-तटीचा होत होता. शेवटी या स्पर्धेचे 2023-24 च्या कल्चरल ट्रॉफीचे कम्प्युटर इंजीनीअरिंग आर्टिफिशियलचे विद्यार्थी मानकरी ठरले. नंतर सीईओ कार्तिक सरांच्या शुभहस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडू , उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व विजेत्या संघाला चषक देऊन आणि विजेत्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.