। तळा । प्रतिनिधी ।
एस.एस. निकम इंग्लिश स्कूल तळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि.9) बाळूभाऊ ढेबे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक राजेश आगिवले यांनी आपल्या प्रास्ताविकांत शाळेच्या क्रीडा विभागाचा आढावा घेतल्यानंतर शाळेतील विद्यार्थी तालुका व जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तम यश प्राप्त करीत असून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत शाळेचे नाव उज्वल केलेले आहेत. तसेच, शालेय उपक्रमांत विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक अभ्यासक्रम यासह समाज उपयुक्त उपक्रमांत शाळेतील विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात. त्यासाठी चेअरमन विक्रांत सप्रे व शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विक्रांत सप्रे हे होते. तर व्यासपीठावर डॉ. चंद्रकांत विचारे, अॅड. चेतन चव्हाण, श्रीराम कजबजे, पुरुषोत्तम मुळे, चंद्रकांत रोडे, विजय ठक्कर, विजय तांबे आदी मान्यवर तसेच पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.