। तळा । प्रतिनिधी ।
जी. एम वेदक कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयामध्ये दिनांक 1 ते 3 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. शाहीना मिर्झा, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक विजय तरटे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, थाळी फेक, गोळा फेक या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वेदक, संस्थेचे सचिव उन्मेषजी वेदक आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य द. ग तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनात पार पडला.







