| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील चांदई आणि डिकसळ येथे असलेल्या तासगावकर शैक्षणिक संकुलात असलेल्या अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक गरड यांनी सर्व खेळाडू यांनी संघभावना ठेवून खेळावे, कोणत्याही स्पर्धेत हार जीत असते आणि त्याप्रमाणे केवळ क्रीडा भावना जोपासावी आणि खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य इंटर इंजिनीअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशन आणि यादवराव तासगांवकर तंत्रनिकेतन यांचे संयुक्त विद्यमाने खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल या रायगड जिल्हा विभागातील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यादवराव तासगांवकर तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य रामेश्वर खनपटे तसेच, एच आर रमाकांत तरे उपस्थित होते .