। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली. दरम्यान खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला उत्साह देण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रवीण गांगल यांनी केले.
कर्जत येथील के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल प्राथमिक आणि माध्यमिक विभागामध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली. संस्थेचे सेक्रेटरी प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, सदस्य सतीश पिंपरे, घेवरचंद ओसवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, पर्यवेक्षक सुनील बोरसे आणि संपदा भोगले व क्रीडा शिक्षिका प्रीती म्हात्रे आणि ज्योती देवघरे आदी प्रमुख उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मशालीचे प्रज्वलन करून झाली. संस्थेचे सेक्रेटरी प्रवीण गांगल यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून प्रोत्साहन दिले.पुढील चार दिवस क्रीडा महोत्सव चालणार असून या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. तर या क्रीडा महोत्सवात सर्व मैदानी खेळ आणि इनडोअर गेम यांच्या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.






