केळुसकर वैद्यकीय महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकण एज्युकेशन सोसायटीचे चं. ह. केळुसकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य व स्टुडंट कौन्सिलचे चेअरमन डॉ. आर. जे. जैन यांच्या उपस्थितीत क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून झाले. यावेळी महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये अवयव दान, रक्तदान, एड्स याबाबत जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.

26 फेब्रुवारी पर्यंत चालणार्‍या क्रीडास्पर्धेत क्रिकेट, क्यारम, ब्यांटमिंटन, धावणे, रिले, रस्सी खेच, टेबल बुद्धिबळ, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. आशिष भगत , क्रीडा प्रमुख डॉ. आनंद नाईक, स्टुडंट कौन्सिलचे व्हाईस चेअरमन डॉ. साक्षी पाटील व डॉ. कविसा पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नम्रता ठाकूर , डॉ. कलिका देवकाते, डॉ. स्वप्ना शिंदे, डॉ. आरती गंभीर, डॉ. सूरज पाटील आणि स्टुडंट कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी तन्मय पेडणेकर, लेडीज रिप्रेझेन्टेटिव्ह भाग्यश्री धाटावकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी कौस्तुभ पाटील व पायल पाटील, सुहानी राणे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेनंतर 27 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून 10 मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे करण्यात आले आहे.

Exit mobile version