| अलिबाग | प्रतिनिधी |
पंचायत समिती म्हसळा व म्हसळा तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा गौरव पुरस्कार 2023-24 सोहळा व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पी.एन.पी. पाष्टी शाळेतील खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत बक्षिसे मिळवली. या कार्यक्रमात पी.एन.पी. पाष्टी शाळेचे क्रीडा शिक्षक प्रफुल्ल रामचंद्र पाटील यांना क्रीडा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात खेळाडू व शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी नायब तहसिलदार म्हसळा गणेश तेलंगे रावसाहेब, पोलीस निरीक्षक म्हसळा संदिपान सोनवणे, गट शिक्षणाधिकारी म्हसळा संतोष दौंड, विस्तार अधिकारी जगदीश घोसाळकर, माजी नगराध्यक्ष म्हसळा दिलीप कांबळे, सरपंच मांदाटणे चंद्रकांत पवार, दुग्ध व्यावसायिक अक्षय गोलांबरे, क्रीडा समन्वयक जाकिर हलसंगी, तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष देवराम डावखर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा प्रकाश हाके यांनी भूषविले.
प्रफुल्ल रामचंद्र पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी, शिक्षक बिलाल शिकलगार, ललित पाटील, विनयकुमार सोनावणे, शिक्षकेतर कर्मचारी संदीप दिवेकर, प्रशांत जोशी, सचिन घरत यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर शाळा समिती अध्यक्ष शांताराम कांबळे, राजाराम धुमाळ, जगजीवन लाड, राजाराम दिवेकर, श्रीपत मनवे, प्रकाश लाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.