पूनम बांगर पैठणीच्या मानकरी

सोलनपाडा युवा मंचाकडून खेळ पैठणीचा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या सोलनपाडा येथे ‌‘नारीशक्तीचा सन्मान, खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. सुधाकर घारे युवा मंच यांच्या माध्यमातून सोलनपाडा गावातील तरुणांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूनम बांगर या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

महिलांना धकाधकीच्या जीवनातून कुटुंबासाठी वेळ काढता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम विजेता पूनम बांगर, तर द्वितीय क्रमांक नीलम थरकुडे आणि तृतीय क्रमांक माया सावंत यांनी पटकाविला. तसेच लहान मुलांचाही कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास माजी सरपंच हरेश घूडे, ऋषिकेश राणे, छगन कोकने आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलनपाडा गावातील तरुण कार्यकर्ते अशोक थरकुडे, सचिन कडलक, करण सावंत, नितेश कडलक, संदेश थरकुडे, निखिल बांगर, रुपेश बांगर, हरिश्चंद्र थरकुडे, भाईचंद थरकुडे, नितेश थरकुडे, रंजीत बांगर, भास्कर बांगर, संतोष बांगर, रोशन बांगर, भावेश थरकुडे, रमेश थरकुडे, शुभम सावंत, उत्तम थरकुडे, रवी बांगर, निलेश सावंत, अशोक कोकणे, कैलास बांगर, तसेच गावातील तरुण-तरुणी उपस्थित होत्या.

Exit mobile version