तळा नगरपंचायतीमार्फत फवारणी

| तळा | वार्ताहर |

तळा नगरपंचायतीमार्फत शहरात वस्ती वाड्यांवरती फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात ठीक ठिकाणी साचत असलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया सारखे तापाचे आजार पसरण्याची शक्यता असते. हा आजार पसरू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून फॉगिंग मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या सभोवताली टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, ई टाकाऊ वस्तूंमध्ये साचलेले पाणी ओतून द्यावे. यामध्ये साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होत असल्याने आपल्या परिसरात सांडपाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील श्रीस्वामी समर्थ नगर, शिंदेप्लाझा, आसावरी नाका आशा अनेक ठिकाणी नगरपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यात आली.

Exit mobile version