अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर
| मुंबई । वृत्तसंस्था ।
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 चा 32 वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अफगाणिस्तानने 20 षटकात आठ बाद 144 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने 18.3 षटकात हे आव्हान गाठत अफगाणिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयाने श्रीलंकेचे उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. अफगाणिस्तान मात्र उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत सुपर-12 मध्ये दुसरा विजय नोंदवला. त्याचे आता चार सामन्यांत चार गुण झाले आहेत. ते अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचे चार सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. जरी त्यांनी एक सामना जिंकला तरी केवळ त्यांचे चार गुण होऊ शकतील. अफगाणिस्तानला आता न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे बाकी राहिले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा अफगाणिस्तान हा दुसरा संघ आहे. त्याआधी नेदरलँड्स ग्रुप बी मधून बाहेर पडला आहे.