| चिरनेर | प्रतिनिधी |
शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जिव्हाळा व आपलेपणाचे नाते निर्माण व्हावे. त्याचबरोबर त्यांना विविध फळ झाडांची माहिती व त्या झाडांच्या उपयुक्ततेचे महत्व कळावे. यासाठी चिरनेर येथील राजिप प्राथमिक केंद्र शाळेच्या प्रांगणात निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी श्रीधर मोकल यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड दि.26 ते 28 डिसेंबर या कालावधी दरम्यान करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक चिरनेर परिसरातील नागरिक करत आहेत. या फळ झाडांमध्ये चिकू, फणस, ॲपल बोर, करमत, स्ट्रॉबेरी, पांढरी जांभूळ, सूपर पेरू, अवाकॅडो, मलबारी नारळ, सफरचंद, चिंच, संत्र, लिंबू, सिताफळ, हनुमान फळ, रुमानिया आंबा, मलबेरी, थाई आंबा, एग्ज फ्रुट, हनुमान फळ, आवळा, अंजीर, रोज ॲपल, अननस यासारख्या 50 फळझाडांची व मोरपंखी, कागदी फुले व शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या लागवडीबरोबर संवर्धनाची जबाबदारी श्रीधर मोकल यांनी घेतली आहे. तर, उपक्रमाला उरण वनपरिक्षेत्राकडून विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यावेळी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन म्हात्रे, माजी अध्यक्ष प्रविण म्हात्रे, महिला व बाल विकास अधिकारी साधना मोकल, मुख्याध्यापक बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान ठाकूर, भारती ठाकूर, समिर डुंगीकर, संदिप चिर्लेकर, मनोज नारंगीकर, हिमंत केणी, पुनम गोंधळी, सुनिता पिचड, विणा साळुंके, कृष्णा व्यापारी, अशोक कांबळे, रामचंद्र म्हात्रे, निलेश ठाकूर, जयेश खारपाटील आदींसह इतर मान्यवर, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
श्रीधर मोकल यांची सामाजिक बांधिलकी
