। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी 10 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत श्रीगणेश दिवलांग संघ अंतिम विजेता ठरला असून, उपविजेता पांडवादेवी रायवाडी संघ ठरला आहे. तर, टीएमबी कारावी आणि भैरवनाथ पेझारी संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अलिबागसह पेण, उरण, रोहा असे जिल्ह्यातील निमंत्रित 16 तुल्यबळ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत श्रीगणेश दिवलांग संघाचा खेळाडू अक्षय पाटील याने अष्टपैलू खेळाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकाविला, पांडवादेवी रायवाडी संघाच्या केदार लाल याला उत्कृष्ट चढाई, तसेच उत्कृष्ट पकडीसाठी भैरवनाथ पेझारी संघाच्या चेतन म्हात्रे, आदर्श खेळाडू जय बंजरंग बेली संघातील स्वप्नील वेळे आणि पब्लिक हिरो म्हणून टीएमबी कारावी संघाच्या संदेश पाटील याला घोषित करण्यात आले.
विजेत्या संघांना ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, राज्य पातळीवरील शरीरसौष्ठवपटू संजय उले, गिरीश शेळके, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अॅड. प्रशांत राऊळ, निलेश नलावडे, प्रसाद मगर, गजानन मगर, विरेंद्र मगर आणि पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महारष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य चित्रा पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक प्रदीप नाईक, अलिबाग पंचायत समितीच्या माजी उपसभापती मीनल माळी, वेश्वीच्या माजी सरपंच आरती पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार कदम, अॅड. प्रसाद पाटील, सत्यजीत दळी, अॅड. मिलिंद चव्हाण, पुनीत शेठ, मधुकर थळे, अनंत मुळूस्कर, अरुण पाटील, राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटू सचिन पाटील, नरेश पडियार, अजित माळी, राघव गुरव, विष्णू मगर, गजानन राऊळ, सदानंद शेळके, सुधाकर राऊळ, सुरेश शेळके, सुभाष पाटील, दादा नाईक आदी मान्यवर मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज गुरव, सुशांत नलावडे, नितेश शेळके, अतिश पाटील, सुयोग घरत, नंदकुमार मिसाळ, नितेश नलावडे, किरण गुरव, अमित मुळूस्कर यांनी मेहनत घेतली.