नव्या नेतृत्वाखाली श्रीलंका सज्ज

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी यजमान श्रीलंकेने त्यांचा तगडा संघ मैदानावर उतरवला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मंगळवारी (दि.23) 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत आलेल्या अपयशानंतर वनिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडले होते आणि आता भारताविरुद्ध चरिथ असलंका हा श्रीलंकेचा नवा कर्णधार असणार आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात 27, 28 आणि 30 जुलै असे 3 टी-20 सामने होणार आहेत. वानिंदू हसरंगा हा अजूनही संघाचा एक भाग आहे. संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सनथ जयसूर्याकडे आहे. यावेळी अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला या संघातून वगळण्यात आले असून दासुन शनाका व दिनेश चंडीमल या मालिकेतून टी-20 संघात परतले आहेत. तसेच, मथिशा पाथिराना आणि महिषा थिक्षाना यांनाही संधी मिळाली आहे.

श्रीलंकेचा टी-20 संघ :
चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, महेश थिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, चमिंडू विक्रमसिंघे, मथिसा पथिराना, बिनुरा फर्नांडो.
Exit mobile version