श्रीरंग मोरे यांचा कृषि विभागातर्फे सन्मान

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयामधील कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांना रायगड जिल्हा कृषी विभागातर्फे सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे करण्यात आले. माणसाच्या जीवन शैलीमध्ये चुकीच्या आहार पध्दतीमुळे वेगवेगळे आजार होतात त्यामुळे सदृढनिरोगी राहण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहार सेवन करणे गरजेचे आहे त्यासाठी सन 2023 या संपुर्ण वर्षा मध्ये संपुर्ण जगभर भारत देशाचा वारसा घेत पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला सदर कार्यक्रम जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात आला.

पोलादपूर तालुका कृषि अधिकारी सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध कार्यक्रम वेगवेगळया ठिकाणी राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पौष्टिक तृणधान्य जनजागृती सभा, प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिला हळदीकुंकू व पाककला स्पर्धा, पथनाटय, ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक, शास्त्रज्ञ भेट, प्रचार प्रसिध्दी इत्यादी कार्यक्रम राबविले. या कामाची दखल घेत विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे, यांनी रायगड जिल्ह्यातून पोलादपूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक श्रीरंग बाबुराव मोरे यांना ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कामी क्षेत्रिय स्तरावरील कृषि सहाय्यक मनोज जाधव, अनिल डासाळकर, अंजुम मोमीन, पुनम क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version