श्रीवर्धनचे अमित परमार यांचा कर्नाटकात डंका

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

मूळ श्रीवर्धनचे असलेले अमित रमेश परमार हे गेली काही वर्षे कर्नाटकातील कलबुर्गी येथे स्थायिक असून तेथे त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. ते सध्या 2021 ते 23 या कालावधीकरिता कल्याण कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉईंट सेक्रेटरी आहेत.

श्रीवर्धन येथील लक्ष्मी नॉव्हेल्टी स्टोअर्स या प्रसिद्ध दुकानाचे मालक रमेशचंद्र परमार यांचे अमित हे सुपुत्र. ते 1998 मध्ये कर्नाटकमधील यादगीर येथे गेले. तेथेच त्यांनी आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केले. नंतर सेल्समन म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली. आज ते विजय मुडीज टी हाऊस, कलबुर्गी, सुस्वाद हॉटेल, भारत इन्व्हेस्टमेंट, सिद्धी बिल्डर्स आदि कंपन्यांचे मॅनेजिंग पार्टनर्स आहेत. 12 कामगारांच्या सहाय्याने सुरु केलेल्या त्यांच्या व्यवसायात आज 112 कामगार रोजगार मिळवीत आहेत. त्यांना आजतागायत मास्टर ब्लास्टर अ‍ॅवॉर्ड, हायेस्ट ग्रोईंग डिस्ट्रीब्युटर अ‍ॅवॉर्ड इ अनेक अ‍ॅवॉर्ड्स मिळाले असून कर्नाटक शासनातर्फे त्यांना वाणिज्य रत्न अ‍ॅवॉर्ड देण्यात आला आहे.

सेन्ट्रल रेल्वे , गुलबर्गा कन्सल्टींग कमिटी, जैन समाज मॅनेजिंग कमिटी इ. संस्थांमध्ये ते कार्यरत असून गुलबर्गा डिस्ट्रिक्ट डिस्टीब्युटरअसो. चे अध्यक्ष इ. मानाची पदे भूषवित आहेत.

Exit mobile version