| कल्याण | प्रतिनिधी |
डोंबिवलीकर सृष्टी पाटील हिने श्रीलंका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच सुवर्णपदकांची कमाई केली. सृष्टीने या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात ज्युनियर बेंचप्रेस, ओपन बेंचप्रेस, ओपन डेडलिफ्ट आणि ज्युनियर डेडलिफ्ट या पाच प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. सृष्टी डोंबिवली पूर्वे येथील पाथर्ली गावातील एका सर्वसाधारण कुटुंबातून असून तिने आणि तिच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने तिची ही आवड जोपासली आहे. त्याचे चांगले फलित ह्या यशातून सृष्टीने मिळविले. सृष्टीच्या या यशाबद्दल शिवसेनेतर्फे व कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत तिचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, संतोष चव्हाण, अमोल पाटील उपस्थित होते.







