खंडाळा घाटात एसटी अपघात; एक गंभीर तर 19 जखमी

| खोपोली | वार्ताहर |

कार्ल्याहून एकवीरा आईचे दर्शन घेऊन निघालेल्या मुंबईतील शिक्षकांच्या बसचा खंडळा घाटात ब्रेक निकामी झाला. हा अपघात रविवारी दुपारच्या दरम्यान घडला आहे. बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसच्या वेगावर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमधील 19 जण किरकोळ जखमी तर 1 गंभीर आहे.

रविवारची सुट्टी असल्यामुळे मुंबईतील एका शाळेचे शिक्षक एकवीरा आईचं दर्शन घेवून निघालेल्या असताना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातून सायमाळ जवळून तीव्र उतारावरून बस (एम.एच 03 -सी-वी- 3609 ) उतरत असतानाच ब्रेक निकामी झाल्याचे चालक सँम्युअल (वय -24) याच्या लक्षात आले. त्यांनी वेगावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही शिक्षकांनी बसमधून उतरत टायरखाली दगड लावल्याने मोठा अनर्थ टळला. भितीपोटी काहींनी उडी मारल्यामुळे 19 जण जखमी झाले. 1 जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी खोपोली पोलिस, अपघातग्रस्त टीम पोहचून मदतकार्य करीत नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

Exit mobile version