एस.टी.बसला अपघात; 15 प्रवासी जखमी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एसटीचा पनवेल हद्दीतील शिरढोण गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमध्यील प्रवास करणारे 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांवर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी-मुंबई ही एसटी मुंबई गोवा महामार्गावरून गुरुवारी (दि.4) रात्री रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ही एसटी पनवेल हद्दीतील शिरढोण गावाजवळ महामार्गावर पुठ्याने भरलेला पहाटे ट्रक पलटी झाला होता. याच वेळी या मार्गावरून मागच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या एसटीने या ट्रक ला मागून जोरात धडक दिली. एसटीतील जवळपास 15 प्रवाशी जखमी झाले. या जखमी प्रवाशांना तात्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, सर्व प्रवाश्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version