| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
छत्रपती संभाजीनगरात मोठा अपघात घडला आहे. तब्बल 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला असून अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुणे ते रावेर प्रवास या मार्गावरुन ही बस धावत होती. मात्र, अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, बस रस्त्यावरुन खाली घसरल्याने पलटी होऊन बसचेही मोठे नुकसान झाले आहे.