| माणगाव | सलीम शेख |
माणगाव पासून 15 किमी अंतरावर असणाऱ्या मौजे रातवड गावच्या हद्दीत मुंबई- गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात होऊन पलटी झाल्याने, सातजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 29) श्रीवर्धन भिवंडी बस माणगावहून मुंबई बाजूकडे जात असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मौजे रातवड गावच्या हद्दीत आल्यावेळी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या खाली जाऊन शेतात पलटी झाली. बसमध्ये एकूण 24 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात निकिता पवार, (30), जितेंद्र पवार, (35), जिनल पवार, (9), महेश जाधव, (24), रोहित पांडे, (30), माया जाधव, (55) व बस चालक असे एकूण सातजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत.







