एसटी बस आणि कारची धडक; तीन जणांचा मृत्यू

| नाशिक | वृत्तसंस्था |

नांदगाव शहरातील गंगाधरीजवळ आज (दि.14) सकाळी एसटी बस आणि अल्टो कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तसेच या घटनेत एक 2 वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी नाशिक इथे हलवण्यात आले आहे.

नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव एसटी (एमएच 14 बीटी 4498) आणि अल्टो कार (एमएच 15 सीडी 2057) ही भगूर इथून भडगावकडं जात असताना समोरासमोर धडकली. या भीषण अपघातात अल्टो कारमधील दोन महिलेंसह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक इथे हलवण्यात आले आहे.

Exit mobile version