विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील दुवा असलेली रोहा-काकळघर व अलिबाग -काकळघर ही एसटी सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवासीवर्गातून जोर धरीत आहे.
बोर्लीमांडला पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रोहा-साळाव-काकळघर व अलिबाग-साळाव-काकळघर या एसटी बसेस सुरू होत्या. परंतु, कोरोनाच्या काळात रस्ता नादुरुस्त हे कारण दाखवून या दोन्ही बसेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे येथील जनतेची विशेषतः रेवदंडा व अलिबाग येथे येणारे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे रायगड विभाग नियंत्रक (रामवाडी-पेण) यांनी अलिबाग-काकळघर व रोहा-काकळघर ही एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर मेहेतर यांनी केली आहे







