थरारक! एसटी चालकाचा प्रवाशांना घेऊन स्टंट; आगीजवळचा व्हिडीओ व्हायरल

। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात शुक्रवारी (दि.27) दुपारच्या सुमारास पनवेल, विचुंबे येथून कार्ल्याला जाणार्‍या कारला आग लागली. (Watch video) यामध्ये सात महिला प्रवास करीत होत्या. अगदी शेवटच्या क्षणी गाडीतील वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे या घटनेत कोणासही दुखापत झाली नाही. मात्र वाहन जळून खाक झाले. यावेळी मार्गावरुन प्रवाशांना घेऊन जाणार्‍या एसटी चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आगीच्या बाजून गाडी काढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती मिळताच, देवदूत मदत यंत्रणा, खोपोली अग्निशमन दल आदींनी घटनास्थळी धाव घेत. आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

Exit mobile version