एसटी संपाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पाठिंबा

| पाली/बेणसे | वार्ताहर |
एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला पाठिंबा म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, एसटी महामंडळ कर्मचारी संघटना यांना पाठिंबाचे निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत हिंगणे, उपाध्यक्ष मंगेश यादव, सुधागड तालुका अध्यक्ष संदीप सिलिमकर आदी उपस्थित होते. या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनाच्या मागण्या सरकारने त्वरित मंजूर करण्यात याव्यात. तसेच दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 918 एसटी संपातील कर्मचारी यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश त्यांनी त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा एसटी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन येत्या आठ दिवसांत भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बंगल्यासमोर घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version