एसटीचा संप खासगी वाहनांच्या पथ्यावर

आव्वाच्या सव्वा दराची आकारणी; प्रवशांना भुर्दंड
। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी विविध मागण्यासाठी सुरू केलेले संप टप्याटप्याने होत असल्याने बाहेरून येणार्‍या बसेस मधून अनेक प्रवासी गावाकडे मार्गस्थ होत आहेत तर काही प्रवासी संप असल्याने खासगी वाहनाने पदरमोड करत प्रवास करत आहेत. प्रवासाकरीता खाजगी वाहने उपलब्ध असली तरी अव्वाच्या सव्वा रूपये आकारण्यात येत असल्याने प्रवासी वर्गाचा खिसाही खाली होत आहे. तसेच अनेकांनी आपली वाहने प्रवासी वर्गासाठी लावली असल्याने प्रवासी वर्गालाही एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. मात्र इंधनाचे व महागाई लक्षात घेता प्रवासाचा दरही वाढला आहे. खासगी वाहतूकदार प्रवासीवर्गाकडून गर्दीच्या हंगामात पनवेलसाठी 250 च्या ऐवजी तीनशे ते साडेतीनशे दर आकारण्यात येत आहे, तर पुण्यासाठी 250, महाबळेश्‍वरसाठी 100 किंवा जास्त दर आकारात आहेत. काही वाहन चालक महाड ते माणगांव 70 रुपये दर आकारात असल्याची माहिती प्रवासी यांनी दिली. दिवाळीच्या सणामध्ये ग्रामीण भागातील नागरीक एसटीवरच अवलंबून असल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच संपामुळे खाजगी वाहतुकदार अव्वाच्या सव्वा रूपये आकारत असून प्रवासी वर्गालाही वेठीस धरत आहेत.

Exit mobile version