गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल

। अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांची आर्थिक उन्नती व्हावी, याकरिता 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पात्र लाभार्थ्यांना शासनामार्फत मंजूर करण्यात येते. या योजनेसाठी अनुसूचित जाती गटई कामगारांकडून गटई स्टॉल मागणीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत यापूर्वीही प्रसारमाध्यमांमार्फत आवाहन करण्यात आले होते.

यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार हा अनुसूचित जातीतील गटई कामगार असावा. त्याचे वय 18 ते 50 असावे. वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 40 हजार, शहरी भागात 50 हजार पेक्षाजास्त नसावे. गटई स्टॉलसाठी मागणी केलेली जागा ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी ताबा दिलेला असावा किंवा स्वत:ची असावी. इच्छुक अनुसूचित जातीमधील गटईच्या कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाज समाज कल्याण रायगड अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड, अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.

Exit mobile version