स्टार क्रिकेट ग्रुप विजयी

| महाड | प्रतिनिधी |

क्रिकेट कट्टा तर्फे महिलांच्या टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.29) महाड शहरातील भिलारे मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी ठरला. तर, पंचायत समिती ग्रुपला उपविजेते पदावर समाधान लाभले.

या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकुण नऊ महिला संघानी आपला सहभाग नोंदविला होता. उन्हाच्या तडाक्यात चौकार षटकारांच्या आतषबाजीनी क्रिकेट रसिकांचे दिवसभर मनोरंज झाले. या स्पर्धेत अंतिम सामना स्टार क्रिकेट क्लब व पंचायत समिती ग्रुप यांच्यात झाला. यावेळी स्टार क्रिकेट क्लबने बाजी मारत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला रोख रकक्कम 5 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितिय क्रमांकाला रोख रक्कम 3 हजार रुपये व आकर्षक चषक तर, तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 2 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज करूना कदम, गोलंदाज रुपाली पारधी व मालिकावीर स्वरा वाढवळ यांना नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपनगराध्यक्ष संदिप जाधव, नगरसेविका पूनम कोरपे, नगरसेविका अक्षया हेलेकर, नगरसेविका पालवी गोळे, संकेत वारंगे, भूषण कदम व राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान नगरसेवक ॲड सनी जाधव, नगरसेविका मिनल जाधव, नगरसेविका गीतांजली महाडीक, पत्रकार रवि शिंदे व महेश शिंदे आदी मान्यवरांनी भेट दिली.

Exit mobile version