| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बँकेत रांगे उभे राहून खाते उघडणे, पैसे काढणे, पैसे भरणे अशा अनेक कामांसाठी बँकेत रांगेत उभे राहवे लागते. ग्राहकांची ही समस्या दुर करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने अलिबागमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी स्टार पॉईंट नावाची संस्था सुरू करण्यात आली. या स्टार पॉईंटच्या अधारे आतापर्यंत 15 हजारहून अधिक ग्राहकांना आधार मिळाला आहे. तात्काळ सेवा मिळत असल्याने स्टार पॉईंटला अधिक पसंती दर्शविली जात असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या बँका आहेत. या बँकामध्ये बचत खात्यापासून करंट खाते उघडले जात आहे. बँकामध्ये पैसे भरण्यापासून पैसे काढण्यापर्यंतची अनेक कामे केली जातात. शासनाच्या वेगवेगळ्या योजनादेखील राबविल्या जातात. ग्राहकांना बँकेत रांगेत उभे राहून आपली कामे करावी लागतात. अनेक वेळा वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे कामांचा खोळंबा होतो. ग्राहकांना तात्काळ चांगली सेवा उपलब्ध व्हावी, म्हणून बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. बँक ऑफ इंडिया पुरस्कृत अलिबाग शहरामध्ये स्टार पॉईंट नावाची संस्था सूरू केली आहे.
या स्टार पॉईंटला मिनी एटीएमदेखील बोलले जाते. स्टार पॉईंटमधून पैसे काढणे, पैसे भरण्याची कामे केली जात असताना, प्रधानमंत्री जनधन योजना, अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, लाडकी बहिण योजना अशा वेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या स्टार पॉईंटच्या माध्यमातून करण्यात आले. बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार पॉईंट चालविण्याचे काम महेश पाटील करीत आहेत. बँक ऑफ इंडियाची लिंक ब्रॅंच म्हणून या स्टार पॉईंटला बोलले जाते.






