महाड महिला क्रिकेट स्पर्धेत स्टार संघ अव्वल

। महाड । प्रतिनिधी ।
महिलांना सांघिक खेळांमधून संधी मिळावी यासाठी क्रिकेट कट्टा या ग्रुपच्या वतीने महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून झेडपी संघाने दुसरा क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेते संघाना पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघ, न्यु महाड इलेव्हन संघ, रायझिंग स्टार, न्युनिक संघ, झेडपी संघ, दिव्यंगांचा पुणे इनिंग स्टार संघ, पंचायत समिती संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात विजय मिळवत स्टार क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली असून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख 5 हजार तर झेड पी संघाने दुसरा क्रमांक पटकावला असून त्यांना चषक आणि रोख 3 हजाराचे पारितोषिक देण्यात आले. तर तिसर्‍या क्रमांकाच्या न्युनिक संघाला चषक देण्यात आला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निकीता जाधव, उत्कृष्ट क्षेत्र रक्षक हर्षला शिर्के, सामना विर छाया साळूंखे, मालिका विर सुगंधा वडाळकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून सोनाली कोरपे यांना गौरविण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनिषा सकपाळ, सोनाली कोरपे, पुजा जगताप, निकीता जाधव, हर्षाली शिर्के, ज्योती नाकते, रुपाली पवार, अश्‍विनी पड्याळकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version