। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील संस्कारधाम विद्यालय मराठी माध्यम या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील गणित, विज्ञान, चित्रकला, हस्तकला, रांगोळी व क्रीडा अशा विविध स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.24) संपन्न झाला.
सजविलेल्या भव्य प्रदर्शन सोहळा दालनाचे उद्घाटन करून विज्ञान, रांगोळी आणि हस्तकला दालनात मान्यवरांनी जाऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृती, रेखाटलेल्या रांगोळ्या आणि बनवलेल्या सुंदर वस्तूंच्या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद लुटला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरून आपली प्रगती करण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहेत, असे चिरमे यांनी सांगीतले. डॉ. सागर रहाळकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आपल्या आयुष्यातील विज्ञान प्रदर्शनाबद्दल देखील अनुभव सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात नथुराम निंबरे यांनी मानवी जीवनात विज्ञानाचे महत्त्व असून हे विश्व विज्ञानावर चालते असे सांगितले. तर, शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट याची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे व मेहनतीने शिक्षण घेणे किती आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्नथुरामजी निंबरे साहेब, संस्थापक सदस्य नाईक आणि डॉ. सागर अजित रहाळकर हे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ चिरमे, परीक्षक म्हणून कलावती प्रजापती, मुख्याध्यापक राजेश पाटील, भारती कदम, मनिषा जाधव आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.