भात कापणीस सुरुवात

| पाताळगंगा | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील निंबोडे येथे नदिच्या पाण्यावर भात शेतीची लागवड करण्यात आली. सदर शेतामध्ये लावलेल्या भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे भात शेतीने जणू सोनेरी शाल परिधान केली आहे. तर काही ठिकाणी भात कापणी सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी एक आठवड्यामध्ये भात कापणीस सुरुवात केली असे प्राथमिक अंदाज शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वातावरणात फेरबदल होत असतात. यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. ते होऊ नये म्हणून एक आठवड्यामध्ये भात कापणीला सुरुवात केली जाईल. उन्हाळी शेतीची पिके हि शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची वाटतात. शिवाय उन्हाळी शेतीमुळे काहींना रोजगार मिळत असते. पाताळगंगा नदी ही सातत्याने वाहत असल्यामुळे नदिच्या लगत असलेल्या उन्हाळी भात लागवड करणे शक्य आहे.

उन्हाळी शेती ही नदिच्या पाण्याने करीत असल्याने नुकसान होण्याचा धोका संभवत नाही, तसेच पावसाळ्यात झालेले शेतीचे नुकसान उन्हाळी लावलेल्या शेतजमिनीतून भरून निघते असे मत शेतकर्‍यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Exit mobile version