रस्त्याच्या बाजूचे चोरीला गेलेले रेलिंग पुन्हा बसवण्यास सुरुवात
। नेरळ । प्रतिनिधी ।
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील सुगवे परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेले रेलिंग चोरीला गेले होते. याबाबत समाज माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नव्याने लोखंडी रेलिंग लावण्यास सुरुवात झाली आहे.
खोपोली-कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेली लोखंडी रेलिंग चोरीला गेले होते. त्याबाबत समाज माध्यमांनी ही माहिती राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या नजरेत आणून दिली होती. या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने अवजड वाहने यांची ये-जा सुरू असते. अवजड वाहनांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा खबरदारी घेतली जात असून रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी रेलिंग लावण्यात आली होती. ती चोरीला गेल्यानंतर वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुन्हा नव्याने रेलिंग लावली जात आहेत. याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू केली होती.
मात्र ही रेलिंग चोरल्यानंतर अनेक महिने उलटून गेले नंतर महामंडळाला जाग आली आहे. मात्र यावर संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारे लक्ष दिले नाही आणि वारंवार दुर्लक्ष करताना पाहायला मिळाले. आता राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून मुरबाड ते कर्जत राज्यमार्ग ज्या ज्या ठिकाणी रेलिंग तुटली आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी चोरीला गेली आहे, अशा ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे. तसेच मुरबाड-कल्याण राज्य महामार्गावर असलेले चाहूची वाडी या गावाच्या शेजारी एक मोठे नागमोडी वळण आहे, या ठिकाणी सुद्धा केले अनेक महिन्यांपासून रेलिंग तुटलेले आपल्याला पाहायला मिळत होती. या ठिकाणी सुद्धा या रेल्वेचे काम पूर्ण झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र आता या अपघातांचे संख्या कमी प्रमाणात होईल, असे आता दिसून येत आहे.
