। खांब । वार्ताहर ।
गेल्या आठ दिवसांपासून भात लागवडीसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडत असल्याने रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात भात लावणीच्या कामाला प्रारंभ झाला असल्याचे पहावयला मिळत आहे.
या वर्षीच्या पावसाळी हंगामात सुरूवातीपासूनच चांगल्या पद्धतीने पावसाने सुरूवात केली असल्याने भात पेरणीची कामेही योग्य कालावधीत पुर्ण करण्यात आली आहेत. तर, पुढील कालावधीत देखील भाताचे राब रूजण्यास वेळोवेळी पुरेसा पाऊस झाल्याने भाताची रोपेही चांगल्या पद्धतीने रूजल्याने शेतकरी वर्गाच्या चेहर्यावरही समाधान दिसून येत आहे. दरम्यान, आठ दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे भात लागवडीसाठी रोपांची योग्य वाढ झाल्याने अखेर शेतकरी वर्गाने जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त साधून आपल्या भात पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.







