| रायगड । प्रतिनिधी ।
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.16) पासून सुरू झाली आहे. यंदाच्या या प्रवेशप्रक्रियेत सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जाणार असल्याचे यंदा तब्बल नऊ लाख 76 हजार 619 आरटीई प्रवेशाच्या जागांवर प्रवेश केले जाणार आहेत. यामध्ये पूर्व प्राथमिक आणि पहिल्या वर्गातील प्रवेशाच्या जागांचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी मुंबई विभागात पहिलीच्या प्रवेशासाठी एक हजार 383 शाळांमध्ये 33 हजार 517 जागा उपलब्ध आहेत. तर पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी 31 शाळांमध्ये 782 जागा तर पूर्व प्राथमिकच्या पुण्यात 214 शाळांमध्ये दोन हजार 750 सर्वाधिक अशा आणि पहिलीसाठी पाच हजार 153 शाळांमध्ये 76 हजार 642 जागा आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत आरटीईच्या प्रवेशासाठी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचाही समावेश करण्यात आल्याने यासाठीच्या जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. या आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पालकांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रवेशासाठी नोंदणी करता येईल, ही नोंदणी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पालकांनी अर्ज कसा करावा, यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशा आहेत जागा आरटीई पहिलीसाठी शाळा उपलब्ध जागा मुंबई - 1383 33517 ठाणे - 2616 43782 पालघर - 2419 32067 रायगड - 2909 23669 पूर्व प्राथमिकसाठी शाळा उपलब्ध जागा मुंबई - 31 782 ठाणे - 15 292 पालघर -1 10 पुणे - 214 2750 नागपूर - 18 442
आरटीईच्या प्रवेशासाठी यंदा 75 हजार 960 शाळांमध्ये नऊ लाख 76 हजार 619 इतक्या जागा विक्रमी जागा उपलब्ध आहेत. पालकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि प्रवेशासाठीची माहिती पाहून आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी नोंदणी करावी.
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय