पनवेल ते वीर रेल्वे नियमित सुरु करा; प्रवाशांची मागणी

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
संपूर्ण रायगड जिल्हा हा मुंबईला जोडणारा मार्ग असून, जिल्ह्यातील चाकरमान्यांची मुंबईकडे ये-जा करण्यासाठी पनवेल ते वीर रेल्वे नियमित सुरु करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

पनवेल ते वीर रेल्वे मार्ग हा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रवाश्यांसाठी उपयुक्त मार्ग असून, या मार्गांवरील जिल्ह्यातील पनवेल, पेण, अलिबाग, मुरुड, सुधागड, रोहा, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर या सर्व तालुक्यांतील प्रवाशांसाठी मुंबईकडे ये-जा करण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त ठरेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर अनेक औद्योगिक क्षेत्र, शाळा कॉलेज, इंजिनिअर कॉलेज असल्यामुळे सर्व क्षेत्रातील प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे.

जर पनवेल ते वीर ही लोकल रेल्वे तीन तासांनी सुरु करुन कमीत कमी या गाडीच्या दिवसातून पाच फेर्‍या केल्या, तर गृहिणी व कॉलेजचे विद्यार्थी यांना पार्ट टाइम नोकरी करुन बेरोजगारीपासून ही सुटका होईल. यामुळे पनवेल ते वीर लोकल रेल्वे गाडी नियमितपणे सुरु करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version