रायगडात स्टार्टअप नाविन्यता यात्रा

। म्हसळा । वार्ताहर ।
राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत म्हसळा आयटीआय येथे स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रचार व प्रसिद्धीची सुरुवात गुरुवारी (दि.25) करण्यात आली. यावेळी वृंदा कानल, प्रल्हाद घरत, स्वप्निल नारकर, राजेश पालकर, शुभम मोरे, सोहम नांदगांवकर, हरिश्‍चंद्र नाक्ती, जीवन कोटकर, नाविन्यता सोसायटीचे पी.एम. आढाव यांनी मार्गदर्शन आणि स्पर्धेचे सर्व निकष सांगितले. या यात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक संस्था आदी ठिकाणी स्टार्टअप यात्रेचा मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार व प्रसिद्धी केली जाणार असल्याचे आढाव यांनी सांगितले.

ज्या उमेदवारांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम केले आहेत किंवा उपक्रम करण्यास इच्छुक आहेत, अशांना त्यांचे कौशल्यप्रदर्शन करण्याची एक चांगली संधी यात्रेद्वारे मिळणार आहे. याबाबत स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण सत्राचे तसेच सादरीकरण सत्राचे आयोजन दि. 15 व 16 सप्टेंबर असे दोन दिवस करण्यात येणार आहे. यावेळी गरजू उमेदवारांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा तालुकास्तरावरुन नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्तम संकल्पना सादर करणार्‍यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम 10 संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना 1 लक्ष रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येणार आहे.

Exit mobile version