55 किलो वजनी गटात सुवर्णपदक
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने विंचुबे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश भिंगारकर यांच्या पुढाकाराने व एमबीबीएचे आयोजन सचिव रायगडचे सेक्रेटरी दिनेश शेळके यांच्या प्रयत्नातून अत्यंत मानाच्या व प्रतिष्ठेच्या 59 वी वरिष्ठ पुरुष गटाची महाराष्ट्र श्री 2022, आठवी महाराष्ट्र वुमन फिटनेस, पहिली महाराष्ट्र वुमन बिकनी 2022, पाचवी मेन फिजिक महाराष्ट्र श्री 2022, दुसरी क्लासिक बॉडीबिल्डिंग महाराष्ट्र श्री 2022, राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव व फिटनेस स्पर्धेचे आयोजन विचुंबे तालुका पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत 55किलो, 60किलो, 65किलो, 70किलो, 75 किलो 80 किलो, 85 किलो आणि वरील गटातील नवोदित बॉडी बिल्डिंगना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द मधील 55 किलो गटात दामोदर हुले या बॉडी बिल्डर्सने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दामोदर हुले यांनी 55 किलो गटात सुवर्ण पदकाला गवसणी घालून महाराष्ट्र श्री 2022 चा मानकरी ठरला. जिम ट्रेनर सचिन भुरटे आणि अभिषेक कदम यांनी या स्पर्धेसाठी उत्तमरित्या तयार केले. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 240 बॉडी बिल्डर्सने सहभाग घेतला होता. प्रत्येक गटातील 1 ते 6 नंबर विजेत्यांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र तर प्रत्येक वजनी गटातील 1 ते 3 क्रमांकाना सुवर्ण, रौप्य, कास्य पदक देऊन गौरविण्यात आले.







