| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक प्रथमच पनवेलमध्ये होत आहे. पनवेल शहरातील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात होणार्या दोन दिवसाच्या बैठकीच्या निमित्ताने अंनिसच्या पनवेल शाखेच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कला प्रदर्शन 21 व 22 जाने रोजी आगरी समाज मंडळाच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात तळमजल्यावर असेल. प्रदर्शनाचे सकाळी 9 वाजता जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का ताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले असेल. तसेच पनवेलमधील सर्व हितचिंतक समविचारी लोकांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. पनवेलमधील सर्व हितचिंतक स्नेहींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सिद्धेश 9870911911 व नाजूका 8976871381 यावर संपर्क साधावा.