राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सरिता भगत यांना प्राप्त

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे प्रदान

अलिबाग | प्रतिनिधी |
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार अलिबाग तालुक्यातील वाडगाव सरपंच सरिता जयेंद्र भगत यांना शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी कोल्हापूर मधील भगवती हॉल गोकुळ शिरगाव येथे सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र,पदक,व,शाल शंकरराव खेमनर,यादवराव पावसे,प्रमिला एखंडे,बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने मान नेतृत्वाचा ,सन्मान कर्तृत्वाचा हे ब्रीद वाक्य घेऊनच महाराष्ट्र मधील कर्तृत्ववान सरपंचाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव केला जातो यावेळी महाराष्ट्रतील निवडक सरपंच मध्ये वाडगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे करून,शासनाच्या अनेक योजनाची अंमलबजावणी करून,आदिवासी बांधवाना अनेक सोयी सुविधा उपलब्द करून, सांस्कृतिक,सामाजिक व क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देणे व इतर विवीध क्षेत्रा मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या सो,सरिता जयेंद्र भगत याची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती .
या वेळी जयेंद्र भगत,प्रसाद पाटील, नीलम थळे, सजना नाईक, अंजली भगत, शुभांगी भगत, प्रमिला कुळे, चंद्रकांत ठाकूर, नरेश थळे, शरद थळे,मंगेश भगत, राजेश भगत, प्रकाश कुळे, रुपेश लाखन रुपाली पाटील अस्विनी लाखन कु,प्राण भगत इत्यादी उपस्थित होते सरपंच सरिता भगत यांना राज्यस्तरीयआदर्श सरपंच पुरस्कार मिळाला म्हणून अनेकांनी अभिनंदन केले.

Exit mobile version